The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार किशोर जोरगेवार सपत्नीक पालखी सोहळ्यात सहभागी; एकविरा माता मंदिरातून निघालेल्या पालखीने श्री माता महाकाली  महोत्सवाचा शुभारंभ.

News Image

राजमाता निवासस्थान, जैन मंदिर मार्गे  पालखी रथ माता महाकाली मंदिरात दाखल.

 

चंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या श्री माता महाकालीच्या महोत्सवाला आज गुरुवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी भक्तिमय  वातावरणात सुरुवात झाली. एकोरी वार्डातील एकविरा माता मंदिर येथून निघालेल्या श्री माता महाकालीच्या पालखीने महोत्सवाचा शुभारंभ झाला. आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक या पालखी सोहळ्यात सहभागी होत माता महाकालीच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. श्रद्धा, भक्तिभाव आणि चंद्रपूरच्या धार्मिक परंपरेशी असलेले नाते जपत आमदार जोरगेवार यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदविला.

एकोरी वार्डातील एकविरा माता मंदिर येथून  निघालेली माता महाकालीची पालखी शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहोचली. त्यानंतर जैन मंदिर मार्गे पालखी रथ माता महाकाली मंदिरात दाखल झाला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक पालखी सोहळ्यात सहभागी होत मातेचे दर्शन घेतले. त्यांच्या सहभागामुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

श्री माता महाकाली महोत्सव हा चंद्रपूरकरांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वपूर्ण  भाग आहे. दरवर्षी या महोत्सवाच्या निमित्ताने माता महाकालीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. पालखी सोहळ्याच्या माध्यमातून शहरातील धार्मिक परंपरा, भक्तिभाव आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या भावनेतून आमदार किशोर जोरगेवार यांचा सपत्नीक सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.

माता महाकालीच्या जयघोषाने आणि  भक्तिमय वातावरणाने पालखी मार्गावर उत्साह निर्माण झाला. पालखी रथ मंदिरात दाखल झाल्यानंतर भाविकांनी माता महाकालीच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. या पालखी सोहळ्याने श्री माता महाकाली महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला असून, चंद्रपूर शहरात भक्तिभावाचे आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔आसोलामेंढा व गोसेखुर्द प्रकल्पांशी संबंधित शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यांच्या निराकरणासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार!🔔पथनाट्य व भिंतीचित्रांतून जलसंवर्धनाचा संदेश.🔔दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी चारा व्यवस्थापनाला प्राधान्य द्या.🔔मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 1,25,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.🔔चंद्रपुरात अवैध विदेशी दारूची वाहतूक  करणाऱ्या २  महिला आरोपींना ताब्यात.🔔रोजगार, शिक्षण क्षेत्राचे बळकटीकरणासाठी पुन्हा संधी द्या : अभिजित वंजारी.🔔७० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न.🔔मौजा वाठोड्यात घरझडतीत देशी दारूच्या  २,५०० बाटल्या जप्त;      १ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.